पुणे : सहकारनामा ऑनलाइन
राज्यात परतीच्या पावसामुळे मोठ्याप्रमाणावर अतिवृष्टी होऊन अनेक नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पुराचे फोटो काढण्याची हौस काहींच्या जीवावर बेतल्याची घटना पुण्यात घडली आहे.
पुण्यातील भिडे पुलाच्या नदीपात्रात फोटो काढताना पाण्याच्या प्रवाहात दोन तरुण वाहून गेले होते त्यापैकी एका तरुणाचा मृतदेह नाना-नाणी घाटाजवळ सापडला आहे. सापडलेल्या तरुणाचे नाव सौरभ कांबळे (वय 19) असे असून तो ताडीवालाया रोड येथील रहिवासी आहे.
तर ओंकार तुपधर (वय १८) हा तरुण अजूनही बेपत्ता असून त्याला शोधण्याचे काम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी मोठा पाऊस होऊन नदीला पूर आला होता त्या दिवशी सायंकाळच्या वरील दोघेजण मित्रासह भिडे पुलाजवळ असणाऱ्या नदीपात्रात उतरून फोटो काढत होते. यावेळी त्यांच्यातीक एकजण वाहून जाऊ लागल्याने त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र सौरभ आत गेला परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले आणि त्यातील एकाच मृतदेह आज सापडला आहे.
हि घटना घडल्यानंतर अग्निशमन दल आणि NDRF जवानांनी या तरुणांचा युध्दपातळीवर शोध सुरु केला. मात्र यात त्यांना काही हाती लागले नाही, आज सकाळच्या सुमारास नाना-नाणी पार्क जवळील घाटात सौरभ याचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती मिळताच NDRF च्या पथकाने त्याचा मृतदेह बाहेर काढून नातेवाईकांना कळवले. वाहून गेलेला दुसरा तरुण ओंकार याचा अजूनही शोध लागला नसून त्याचाही शोध युद्ध पातळीवर सुरू आहे.