दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील भरतगाव येथे एका हॉस्पिटलच्या सौचालयाच्या भांड्यामध्ये अवघ्या एक दिवसाच्या पुरुष जातीच्या बाळाला फेकून दोन महिला आणि एक पुरुष फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरतगाव येथील एका खासगी दवाखान्यामध्ये एका टॉयलेटच्या भांड्यामध्ये एक दिवसाचे एक जिवंत बाळ आढळून आले, हि बाब दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी लागलीच याची माहिती यवत पोलिसांना दिली. त्यांनी सांगितल्यानुसार हा प्रकार आज 31 डिसेंबरला दुपारी ज्यावेळी दवाखान्याच्या शौचालयाचा दरवाजा उघडण्यासाठी येथील कर्मचारी गेली त्यावेळी तिला त्या सौचालयात एक दिवसाचे अर्भक दिसून आले.
हे अर्भक अश्या पद्धतीने टाकण्यात आले होते की त्याचे डोके हे खाली आणि पाय वर होते. जेणेकरून ते मृत होऊन याचा थांगपत्ता कुणाला लागू नये अशा पद्धतीने त्यास आत टाकण्यात आले होते.
कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री दवाखाना बंद झाल्यावर येथे दोन महिला आणि एक पुरुष आले होते. त्यांनी त्यातील एका महिलेच्या पोटात दुखतंय असा बहाणा करून ते दवाखान्यात आले होते.
या घटनेची पोलिसांना माहिती समजल्यानंतर त्यांनी दवाखाण्यात जाऊन त्या नवजात बालकाला आपल्या ताब्यात घेऊन त्यास ससून रुग्णालयात पाठवून दिले.
सध्या या बाळाची प्रकृती ठीक असून यवत पोलीस ठाण्यात वरील तीन संशयित इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार लोणकर हे करीत आहेत.