दिलासादायक.. केडगाव, बोरीपार्धी आणि पाटस’मधील सर्व 19 जण निगेटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील केडगाव, बोरीपार्धी, पाटस येथील तब्बल 19 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे या तिन्ही गावांना काहीसा दिलासा मिळाला आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांनी सहकारनामा शी बोलताना माहिती दिली आहे.

दौंड तालुक्यातील या तिन्ही गावांमधील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 17 वर पोहोचला आहे. जे लोक या कोरोना बाधितांच्या संपर्कात आले होते किंवा ज्यांना काहीसा त्रास जाणवत होता अशा सर्व 19 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. या कोरोना टेस्टमध्ये सर्व 19 जण निगेटिव्ह आल्याने या गावांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.