कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर खा.सुप्रिया सुळे यांची ‛दौंड’ला आढावा बैठक



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

शहरात कोरोना महामारीचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे ज्यामुळे येथील बाधित रुग्णांची संख्या रोजच वाढत आहे. सरकारी कोविंड सेंटर सहित शासनाने अधिग्रहित केलेल्या खाजगी दवाखान्यांमध्ये सुद्धा बेड फुल ची परिस्थिती आहे, याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दौंडमध्ये आढावा बैठक घेतली. 

येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण सूचना केल्या. यावेळी उपस्थित असलेले पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सुद्धा परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथे योग्य उपाय योजना राबविण्यात बाबत मार्गदर्शन व  सूचना केल्या. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रशासनाच्या वतीने कोणत्या उपाय योजना राबविल्या गेल्या? व  त्या योजना पुरेशा आहेत का? असा सवाल सुद्धा उपस्थित केला तेव्हा संबंधित अधिकारी निरुत्तर झालेले दिसले. ज्या प्रभागांमध्ये बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे, गजबजलेल्या वस्त्यांमध्ये धारावी पॅटर्न राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सूचना केलेल्या उपाय योजनांची नागरिकांकडून अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याकडे पोलीस प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे असेही ही प्रसाद म्हणाले. येथील खाजगी दवाखाने बाधित रुग्णांची माहिती प्रशासनाला देत नसतील तर अशा दवाखान्या वर गुन्हा  दाखल करण्याचे आदेश आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.

या बैठकीस जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, नगराध्यक्ष शितल कटारिया, वैशाली नागवडे, आप्पासो पवार, रणजीत शिवतारे, वीरधवल जगदाळे, हाजी सोहेल खान आदी उपस्थित होते.