Categories: Previos News

चौफुला-मोरगाव रोडवर पडवी जवळ 19 लाखांच्या ऐवजाची चोरी, चार चोरट्यांनी साधला डाव



दौंड : सहकारनामा ऑनलाईन *अब्बास शेख)

रविवार दिनांक 13/09/2020 रोजी मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास चौफुला ते मोरगाव रोडवर असणााऱ्या पडवी (ता.दौंड जि.पुणे) या गावच्या हद्दीमध्ये गायकवाड मळा येथील ओढयाचे जवळ चार अज्ञात चोरट्यांनी सुमारे 19 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची गंभीर घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे चोरटे अगोदर काळ्या रंगाच्या कारमध्ये आले आणि त्यांनी मालवाहतूक टेंपोट्रकला कार आडवी लावुन रस्ता रोखुन धरत चालक व या घटनेतील फिर्यादी रफिकउददीन अब्दुलषकुर खान (वय 48 वर्षे व्यवसाय ट्रक चालक रा. सिंध्दीभोंडीया ता. पितुमपुर. जि.धार. राज्य मध्यप्रदेश) याच्या तसेच त्या बरोबर असनारा सहचालक अनिल चैहान याच्या गळयाला चाकु लावुन ओरडला तर बघ अशी धमकी देवुन त्यांच्या ताब्यातील टेंपोट्रक व त्या मधील माल व त्यांच्याकडील रोख रक्कम असा एकुन 19,07,084/-रू रकमेचा माल जबरदस्तीने त्या चार अज्ञात चोरटयांनी चोरून नेला आहे.

या घटनेमध्ये 1) 8,00000/- 

रू किमतीचा अशोक लेलेन्ड ईकोमेंट कंपनीचा सोनेरीलाल  लरंगाचा ट्रक नं MH 10 CR 4149 जु.वा.कि.अ

2) 9,51,109/- रू किमतीचे कपडयाचे धाक्याचे 146 बंडल एकुन 9020 किलो गॅम वजनाचे 

3) 151975 /- रू किमतीचे प्लॅस्टीकचे 12 रोल एकुन वजन 1100 किलो गॅम

4) 4000/- रू रोख रक्कम त्यामध्ये 500 रू दराच्या 07 नोटा व 100 रू दराच्या 05 नोटा असा एकूण 19,07,084/- रू किमतीचा माल या चार अज्ञात चोरटयांनी चाकुचा धाक दाखवुन जबरदस्तीने चोरून नेला आहे.

या घटनेची माहिती मिळताच डाॅ सई भोरे, उपविभागीय अधिाकरी हवेली विभाग तसेच यवतचे पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसराची पाहणी केली तसेच चोरट्यांचा माग काढण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago