दौंड शहर, परिसरात ‛कोरोना’चा जोर कायम, आज पुन्हा 18 जणांना संसर्गाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

शहर व परिसरात कोरोना संसर्गाने पुन्हा वेग घेतला आहे, येथील शिवराज नगर परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोना ची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. शहरातील कोरोना ची परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने सर्वांच्याच चिंता वाढल्या आहेत.

दि.22 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 96 संशयितांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली, त्यापैकी 18 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

22 ते 60 वर्ष वयोगटातील 4 महिला व  14 पुरुष रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. बाधित रुग्णांमध्ये शहरातील 13,रा रा पो दलातील 2 तसेच ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.