दौंड शहराला थोडा दिलासा ! 183 पैकी 10 जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

दौंड शहर आणि परिसरामध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते, मात्र आता जवळपास हा आकडा सहा ते सात टक्क्यांवर आला असल्याचे आजच्या अहवालावरून दिसत आहे.

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 31/8/2020 रोजी एकुण 183 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती.  त्यांचे अहवाल अर्ध्या तासात प्राप्त होऊन 183 पैकी फक्त 10 व्यक्तीचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत तर 173 व्यक्ती चे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 3

महिला आणि 7 पुरुषांचा समावेश असून दौंड शहर 6, एस आर पी एफ गट नं 7 – 1, आणि ग्रामीण मध्ये 3 असा एकूण प्रभाग निहाय अहवाल असून यामध्ये 13 ते  80 वर्ष वयाच्या रुग्णांचा समावेश आहे.