दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्याला सध्या कोरोनारूपी मोठे ग्रहण लागले आहे. हे ग्रहण दिवसेंदिवस जास्तच प्रभाव दाखवू लागले आहे.
आज यवत कोविड सेंटरकडून आलेल्या अहवालामुळे अनेक गावांचे धाबे दणाणले आहेत. आज आलेल्या अहवालामध्ये तब्बल 18 गावांतील 51 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत याबाबतची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यवत 17, केडगाव 3, वाखारी 2, बोरीपार्धी 2, नानगाव 6, बोरीऐंदी 3, राहू 1, दौंड 1, देवकरवाडी 1, कुतवळ वाडी 1, बारवकर वाडी 1, कुदळेवस्ती 1, दहिटने 1, नाथाची वाडी 2, पडवी 1, पाटस 1, खुटबाव 2, डाळिंब 1 असे 18 गावांतील एकूण 51 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
एकूण 106 जणांचे स्वॅब प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते, त्यापैकी 51 जण पॉझिटिव्ह आले तर 55 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 6 वर्षांच्या बालकासह 60 वर्षे वयाच्या वृद्धांचा समावेश असून यामध्ये 38 पुरुष तर 13 महिलांचा समावेश आहे.