दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड शहर आणि ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे पुन्हा एकदा जास्त प्रमाणात रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी केले आहे.
डॉ.संग्राम डांगे यांच्याकडून मिळालेल्या अहवालानुसार आज दिनांक 3/9/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंडतर्फे एकुण 100 जणांची रॅपिड अँटीजेन द्वारे तपासणी करण्यात आली. हि तपासणी केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सर्व रिपोर्ट प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकूण 18 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या तर 82 व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 5 महिला आणि 13 पुरुषांचा समावेश असून यातच एका 6 वर्षीय बालकाचाही समावेश आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे दौंड शहर 6, एस.आर.पी.एफ. गट 7 चे 2, ग्रामीणमध्ये 10, अशी वार्डनिहाय आकडेवारी असून बाधित रुग्णांचे वय हे 06 ते 64 वर्षां दरम्यान आहे.