आज दौंड शहरात 18 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा आलेख वाढत चालला आहे. आज दि.10 मार्च रोजी 18 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

आज 83 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट घेण्यात आली त्या पैकी 18 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर 65 जनांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेले 11 रुग्ण हे दौंड शहरातील असून 7 रुग्ण हे दौंड शहरालगत असणाऱ्या भागातील आहेत. 

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 12 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. दौंड शहर आणि दौंडच्या ग्रामिण भागामध्ये सध्या कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या वाढत असून यावर लवकर उपाय योजना राबविल्या नाहीत तर हा आकडा वाढत जाऊन सर्वांचीच डोकेदुखी बनेल यात शंका नाही.