Categories: Previos News

दौंड शहरामधील कोरोनाची परिस्थिती सध्या तरी नियंत्रणात ! 179 पैकी फक्त 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, तर यवत, केडगावसह या 5 गावांत 8 पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड शहर व परिसरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर झालेला होता. रोज बाधित रुग्णांची संख्या वाढतच होती ज्यामुळे येथील प्रशासनावरील ताण वाढत होता. परंतु सध्या शहरातील कोरोना ची परिस्थिती थोडीशी नियंत्रणात आली असल्याचे पहायला मिळत आहे. 

बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह येण्याच्या प्रमाणात कमालीची वाढ झालेली दिसते आहे. उपजिल्हा रुग्णालय, दौंड नगर पालिका व  पोलीस प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे दौंड करांना दिलासा मिळत आहे ही सर्वांसाठीच समाधानाची बाब आहे.

दि.2 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 179 संशयितांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली त्यापैकी फक्त 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

25 ते 75 वर्ष वयोगटातील 2 महिला व 3 पुरुष रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील मीरा सोसायटी, नवगीरे वस्ती,सरपंच वस्ती परिसरातील रुग्णांना संसर्गाची लागण झाली असल्याची ची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.

तर यवत ग्रामिण रुग्णालयामध्ये दि.02 ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेल्या 36 स्वॅब पैकी 08 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

यामध्ये यवत -3, केडगाव -2, बोरीपर्धी -1, नांदूर – 1, सांगवी दुमला -1 या गावांचा समावेश आहे. या रुग्णांचे वय हे 2 वर्षे ते 65 वर्षे या दरम्यान असून यात 05 – पुरुष आणि 03- महिलांचा समावेश आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

4 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

20 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago