मुंबई : समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं काम सुरु असताना एक मोठा अपघात घडला आहे. या समृद्धी महामार्गावरील शहापूर (ठाणे) जवळ गर्डर कोसळून यात 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी अपघात स्थळी धाव घेत घटनास्थळाचा आढावा घेतला आहे. आज प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर येण्याआधीच हा भयंकर अपघात घडल्यामुळे प्रशासकीय यंत्रनांनीही तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.
असा घडला अपघात…
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम शहापूर येथे सुरू आहे. याच ठिकाणी सोमवारी मध्यरात्री गर्डर जोडण्याचं काम सुरू होतं. काम सुरू असताना येथील एक क्रेन उड्डाणपुलाच्या स्लॅबवरच कोसळली त्यामुळे क्रेन आणि उड्डाणपुलाचा स्लॅब हा 100 फुटांवरून खाली कोसळला. स्लॅब कोसळत असताना यावर काम करत असलेले मजूरही खाली पडले तर काहीजण या खाली दबले गेले. त्यामुळे येथील मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.
अपघात घडल्याची माहिती मिळताच एन.डी.आर.एफ ने घटनास्थळी धाव घेत गर्डन खाली दबलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात यश आले आहे.
प्राप्त झालेल्या मृतांची नावं
पप्पू कुमार – बिहार
राजेश शर्मा- उत्तराखंड
संतोष जैन- तामिळनाडू
प्रदीप रॉय- पश्चिम बंगाल
कन्नूर- तामिळनाडू
अरविंद कुमार उपाध्याय- उत्तर प्रदेश
लल्लन राजभर- उत्तर प्रदेश
आनंद कुमार चंद्रमा यादव
बेलदार
सुरेंद्र कुमार पासवान
राधेश्याम बिरजू यादव
परमेश्वर कुमार