दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी केडगाव, बोरीपार्धी ग्रामपंचायतीने सलग 3 दिवस गावे बंद ठेवले असले तरी कोरोना रुग्ण वाढीचा दर हा कमी होताना दिसत नाहीये.
दि. 30 मार्च रोजी यवत ग्रामिण रुग्णालयात 164 जणांचे नमुने घेण्यात आले होते. त्यांचा अहवाल आज प्राप्त झाला असून 164 पैकी 59 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या गावांमध्ये यवत 14, केडगाव 11, चौफुला 6, पाटस 4, एकेरीवाडी 3, खामगाव 3, कोरेगाव 3, कडेठान 2, डुबेवाडी 2, भरतगाव 2, वरवंड 1, कासुर्डी 1, खोपोडी 1, नांदूर 1, पारगाव 1, खुटबाव 1, पडवी 1, अष्टापुर 1, उरुळी कांचन 1 अशी गाव निहाय आकडेवारी समोर आली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 35 पुरुष आणि 24 महिलांचा समावेश असून यात 6 वर्षाच्या बालकापासून 75 वय असणाऱ्या वृद्धाचा समावेश आहे.