पाटस 17, कुरकुंभ 06 तर या 11 गावांत एकूण ‛42’ जणांना कोरोनाची बाधा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील कोरोना विषाणूची स्थिती भयावह होत चालली आहे. तालुक्यातील विविध गावांमध्ये कोरोनाने अक्षरशः हा हा कार माजवला आहे.

आज आलेल्या अहवालानुसार 11 गावांतील 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात सर्वात जास्त रुग्ण हे पाटस येथील असून त्या खालोखाल कुरकुंभ चा नंबर लागला आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक रासगे यांच्याकडून स्वामी चिंचोली कोविड सेंटरच्या मिळालेल्या अहवालानुसार पाटस 17,  कुरकुंभ 06, वडगाव दरेकर 05, वरवंड 03, दौंड 04, पांढरे वाडी 02, राजेगाव 01, गिरीम 01, मलठन 01, बिरोबावाडी01, असे या 11 गावांतील एकूण 42 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये 25 पुरुष आणि 17 महिलांचा समावेश आहे.