दौंड : सहकारनामा ऑनलाईन
मागील काही दिवसापूर्वी शहर व परिसरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या सतत वाढतच होती परंतु सध्या मात्र येथील बाधित रुग्णांची संख्या घटत चालली असल्याचे सध्या दिसते आहे, आणि ही बाब दौंड करांसाठी खूपच समाधानाची आहे. नागरिकांनी संसर्ग होऊ नये म्हणून घेतलेली काळजी व संसर्गाचा प्रभाव वाढू नये म्हणून प्रशासनाने उपाययोजनांची केलेली योग्य अंमलबजावणी यामुळे हे हे शक्य होत आहे.
दि.१० ऑगस्ट रोजी उपजिल्हा रुग्णालयाने येथील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या १६२ जणांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले होते, त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी सांगितले. राज्य राखीव पोलीस दलातील दोन जणांचा अहवाल प्रलंबित आहे.
प्रशासनाकडून सुरक्षित वावरा बाबतचे धोरण राबविण्यात आल्याने व दौंड करांनी सुद्धा त्याची अंमलबजावणी केल्याने शहरातील विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे दिसते आहे. प्रशासन व दौंड करांसाठी ही अत्यंत जमेची बाजू समजली जात आहे.