दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहर व परिसरात कोरोनाचा प्रसार दिवसागणिक वाढतोच आहे, त्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.
जनता कर्फ्यू झाला, लॉकडाऊन करून झाले, आरोग्य तपासणी मोहीम झाली परंतु येथील बाधित रुग्णांची संख्या रोज वाढतेच आहे. त्यामुळे शहरात आता नेमका कोणता पॅटर्न राबविला तर संसर्गाची साखळी तुटेल असा प्रश्न प्रशासनासमोर आहे.
दि. 28 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 84 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली
त्यापैकी तब्बल 16 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे 14 ते 70 वर्ष वयोगटातील असून यात 13 पुरुष व 3 महिला रुग्णांचा समावेश आहे.
शहरातील शालिमार चौक,सिद्धार्थ नगर,जनता कॉलनी, महेश सोसायटी, संस्कार नगर येथील तसेच राज्य राखीव पोलीस दलातील दोन जवानांचा बाधित रुग्णांमध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.