Breaking News | अपार्टमेंटमधील  15 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहन जळून खाक… दौंड शहरातील घटना

दौंड : शहरालगत असलेल्या लिंगाळी गावाच्या हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये असलेली 16 वाहने आगीत भस्मसात झाली असल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अपार्टमेंट मधील रहिवासी हनीफ हमीद तांबोळी यांनी दौंड पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना दिनांक 29 डिसेंबर रात्री 1 च्या दरम्यान लिंगाळी हद्दीतील कल्पतरू अपार्टमेंटच्या पार्किंग मध्ये घडली. सदर प्रकरणी झालेल्या प्रकरणाची तक्रार घेण्यात आली आहे, या घटनेत 15 दुचाकी वाहने आणि 1 नॅनो कार जळाली आहे. सदर चा प्रकार नक्की कशामुळे झाला आहे याचा तपास करण्यात येत आहे अशी माहिती ठाणे अंमलदार महेंद्र गायकवाड यांनी दिली.

सदरच्या घटनेत इलेक्ट्रिक बोर्ड, साहित्य, पाईप जळून खाक झाले असून आगीमुळे स्लॅब चा प्लास्टर भाग कोसळला आहे. ही वाहने जळाली आहेत की जाळण्यात आली आहेत याचा उलगडा झालेला नसल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड करीत आहेत.