Categories: Previos News

टाकळीभीमा नदीवरील पुलासाठी 15 कोटी तर पिंपळगाव, उंडवडी,खामगाव रस्त्यासाठी 7 कोटींचा निधी मंजूर : आ.राहुल कुल यांची माहिती



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील टाकळीभीमा येथील नदीवरील पुलासाठी १५ कोटी तर

पिंपळगाव – उंडवडी – खामगाव या ७ किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आल्याची  माहिती दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, दौंड तालुक्यातील पिंपळगाव – उंडवडी  – खामगाव या मुळा मुठा नदीच्या समांतर असलेल्या रस्त्याच्या कामा करण्याबाबत आमदार राहुल कुल यांनी तारांकित प्रश्नांच्या माध्यमातून मागणी केली होती. त्याला निधी देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिले होते परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती त्यानंतर आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभेच्या विविध समित्यांशी पत्रव्यवहार करून व बैठका आयोजित करून सदर रस्त्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची विनंती केली होती.

त्यावेळी सदर कामाचा समावेश अर्थसंकल्पात करण्याचे अधिवेशन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार सदर रस्त्याच्या कामासाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

तर टाकळी भीमा ता. दौंड येथील भीमा नदीवरील पुलाच्या कामासाठी १५ कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली असून अर्थसंकल्पीय अधिवेशन २०१६ मध्ये आमदार अॅड. राहुल कुल यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करत दौंड व शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतींना जोडणारा जवळचा रस्ता असल्यामुळे या पुलाला मंजुरी मिळण्याची मागणी केली होती. 

त्यानंतर काही काळ हे आश्वासन प्रलंबित राहिले. २०१९ मध्ये पुन्हा आमदार झाल्यांनतर आमदार अॅड. राहुल कुल यांनी या कामाचा पाठपुरवा करण्यास सुरवात केली सदर कामाला निधी देण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी दिले होते परंतु आश्वासनाची पूर्तता झाली नव्हती त्यानंतर आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभेच्या विविध समित्यांशी पत्रव्यवहार करून व बैठका आयोजित करून सदर रस्त्याच्या आश्वासनाची पूर्तता करण्याची विनंती केली होती.

त्यावेळी सदर कामाचा समावेश अर्थसंकल्पात करण्याचे अधिवेशन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पात या पुलाच्या कामासाठी सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तालुक्यातील विकास कामांसाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

12 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago