15 दिवसांच्या संचारबंदी मध्ये काय चालू, काय बंद..



– सहकारनामा

मुंबई : राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आता राज्य सरकारने 15 दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. याबाबतची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली असून या 15 दिवसीय संचारबंदीमध्ये खालील पैकी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

★ औद्योगिक क्षेत्रातील उद्योगधंदे सुरू राहणार, शाळा महाविद्यालय बंद राहणार

★ मेडिकल, अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार

★ गरजूंना शिवभोजन थाळी पुढील एक महिना मोफत देणार, तर सध्याची किंमत कमी करणार

★ पेट्रोल, डिझेल, सीएनजी पंप सुरू राहणार

★ हवाई वाहतूक, रेल्वे सेवा सुरू राहणार

★ सेबी, पेट्रोलियन, आयटी कार्गो सेवा सुरू ठेवणार 

★ कंपन्यांनी त्यांच्या कॅम्पसमध्येच कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी

★ हॉटेल्स बंद राहणार, होम डिलिव्हरी सुरू

★ पार्सल सेवा सुरू राहणार

★ अति आवश्यक सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी बस सेवा सुरू राहणार

★ अत्यावश्यक आणि योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही

★ अनावश्यक ये-जा बंद राहणार

★ 15 दिवस संचारबंदी लागू राहणार

★ उद्या संध्याकाळपासून राज्यात संचारबंदी लागू

★ उद्या रात्री 8 वाजल्यापासून कठोर निर्बंध

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवृत्त डॉक्टर आणि नर्सेसला मदतीचं आवाहन केले असून राजकीय पक्षांनी यात राजकारण करू नये असे आवाहन केले आहे.

आणि राज्यात लसीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला असून लस दिल्यानंतर प्रतिकारकशक्ती येण्यासाठी काही दिवस जावे लागत असल्याने नागरिकांनी बिनधास्त न राहता काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.