15 व्या वित्त आयोगातून यवत येथे बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ठ ! निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचा युवकांनी आरोप करत काम पाडले बंद



|सहकारनामा|

दौंड : यवत ता.दौंड येथे बांधण्यात येत असलेल्या  पाण्याच्या टाकीचे काम हे निकृष्ठ दर्जाचे सुरू असल्याचा आरोप करत आरिफ तांबोळी, अझहरुद्दीन तांबोळी, लियाकत शेख, समीर सय्यद, फैय्याज नालबंद यांनी हर काम बंद पाडले आहे.

(पहा व्हिडीओ)

पाण्याच्या टाकीचे काम निकृष्ठ दर्जाचे!तसेच याबाबतची तक्रार त्यांनी ग्रामसेवक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही केली आहे.

पाण्याची टाकी आणि  पेविंग ब्लॉकसाठी ग्रामपंचायत यवत यांच्या 15 वित्त आयोगातून 3 लाख रुपये निधी मंजूर झाला होता. त्या निधीमधील हे काम सध्या सुरू असून या कामाची गुणवत्ता हि खराब दर्जाची असल्याने एकतर हे काम बंद करून या कामाची चौकशी व्हावी अथवा हे काम करणाऱ्या ठेकेदाराची या कामाबाबतच्या दर्जाची 3 वर्षांची बँक ग्यारंटी घेण्यात यावी अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते समीर सय्यद यांनी केली आहे.

याबाबत हे काम करणारे ठेकेदार मयूर एडके यांना संपर्क साधला असता, या कामाचे आरसीसी पडदे झाले आहेत मात्र अजून प्लास्टर झाले नसल्याने यातील पाणी लिक होत असल्याचे सांगितले.