| सहकारनामा |
मुंबई :
राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 मे पर्यंत 15 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात संचारबंदी आणि मिनी लॉकडाउन करूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यानं राज्य सरकारने कडक लॉकडाऊन 15 ने पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ब्रेक दि चेन अंतर्गत’ हा निर्णय घेतला असून राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी आता कडक लॉकडाउन ची गरज निर्माण झाली होती.