Categories: Previos News

चिमुकल्यांनी साठवलेली ‛15’ हजारांची रक्कम दिली कोरोना लढ्याला, अजितदादांकडे केली रक्कम सुपूर्द



बारामती : सहकारनामा ऑनलाईन

रमजान ईदमध्ये नातेवाईक आणि वडीलधाऱ्यानी दिलेली ईदी जपून ठेवत ती कोरोना लढ्यासाठी देत बारामतीतील बागवान कुटुंबातील चिमुकल्यांनी अनोखा आदर्श निर्माण केलाय. फिरोज आणि अमजद बागवान या दोघा भावंडांच्या चार चिमुकल्यांनी ईदी म्हणून मिळालेले तब्बल 15 हजार रुपये जमा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द केले. मुलांनी दाखवलेलं सामाजिक भान पाहून अजित पवार यांनीही या मुलांना आपल्या गाडीतून एक खाऊचा पुडा या मुलांना भेट दिला.

बारामतीतील जिशान फिरोज बागवान, मलिका अमजद बागवान, फरहान फिरोज बागवान आणि अमन अमजद बागवान या चिमूकल्यांकडे रमजान ईदनंतर जवळपास 15 हजार रुपये ईदी जमा झाली होती. नेहमीप्रमाणे या रकमेतून ही मुले काहीतरी खरेदी करतील या विचारात पालक असतानाच या चिमुकल्यांनी ही रक्कम कोरोना लढ्यासाठी वापरण्याचा मानस व्यक्त केला. त्यानुसार स्थानिक पत्रकार नविद पठाण यांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातली. त्यानंतर या मुलांसह फिरोज बागवान, बतुल शेख यांनी या रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली. अजित पवार यांनी या मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी करत गाडीतून एक खाऊचा पुडा त्यांना भेट दिला. मुलांच्या या कार्याचे संपूर्ण बारामतीतून कौतुक होत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago