दौंड मधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकास खासदार सुप्रिया सुळे यांनी 15 लाखाचा निधी द्यावा : मृत्युंजय प्रतिष्ठानची मागणी



दौंड : दौंड मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाचे काम सुरू आहे, परंतु निधी अभावी सध्या काम बंद पडले आहे.खा. सुप्रिया सुळे यांनी या स्मारकास 15 लाखाचा निधी द्यावा अशी मागणी या स्मारकासाठी पुढाकार घेतलेल्या येथील मृत्युंजय प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आली आहे. दि.5 ऑक्टोबर रोजी दौंडमध्ये आलेल्या खासदार सुळे यांना प्रतिष्ठानच्या वतीने मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतिष्ठान अध्यक्ष विवेक गटणे, कार्याध्यक्ष सतीश सोनोने, सचिव विकास देशपांडे उपस्थित होते.

निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढायचे महानायक सावरकर यांच्या स्मृति स्मारकाचे संपूर्ण काम आकर्षक पद्धतीने करून दौंड शहराच्या सौंदर्यात भर टाकून सावरकरांसारख्या क्रांतिकारकांची स्मृती जतन करून नव्या पिढी पुढे राष्ट्रभावना जागृत करणे हीच प्रामाणिक तळमळ आहे. आपले सहकार्य, मार्गदर्शन व आर्थिक मदत आम्हास मिळावी हीच प्रांजळ अपेक्षा आहे.