केडगावमध्ये 148 जणांची करण्यात आली रॅपिड अँटीजेन टेस्ट, मोकाट फिरणाऱ्यांना मिळाला ‛प्रसाद’



|सहकारनामा|

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे

आज दि. 25 मे रोजी 148 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 3 जण पॉझिटव्ह सापडले असून बाकी 145 जण निगेटिव्ह आले आहेत.

मोकाट फिरणारे नागरिक, दुचाकीस्वार आणि संशयित इसमांना केडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले आणि त्यांच्या पोलीस स्टाफने रस्त्यावर अडवून त्यांची विचारपूस करत होते. यावेळी जे काहीही काम नसताना  मोकाटपणे बाहेर फिरत होते त्यांना पकडून त्यांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत होती. 



तर काहीजण मात्र आवर्जून येथे येऊन आपली अँटीजेन टेस्ट करून घेत होते. हा उपक्रम केडगाव ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि केडगाव पोलिस सटेशन मार्फत आज राबविण्यात आला. नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, मास्क परिधान करावे, साबणाने व्यवस्थित हात स्वच्छ करत रहावेत आणि सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.