– सहकारनामा
दौंड : आज दि.12 एप्रिल रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय, यवत कोविड सेंटर आणि स्वामी चिंचोली असे तिन्ही कोविड सेंटरचा कोरोना टेस्टिंग अहवाल प्राप्त झाला आहे.
आज आलेल्या या रिपोर्टनुसार संपूर्ण दौंड तालुक्यात आज 143 जण कोरोना बाधित झाले असून यात एसआरपीएफ च्या 36 जवानांचा समावेश आहे. याबाबतची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यातील यवत आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटर चा आज प्रलंबित अहवाल आला असून या अहवालानुसार एकूण 33 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
स्वामी चिंचोली कोविड सेंटर कडून एकूण 56 स्वॅब पाठविण्यात आले होते त्या पैकी 25 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तर यवत कोविड सेंटरकडून 242 स्वॅब प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी 47 जनांचा अहवाल आला असून या पैकी 8 जण पॉझिटिव्ह आले असून 39 जण निगेटिव्ह आले आहेत. तर 195 जनांचा अहवाल अजून प्रतीक्षेत आहे.
स्वामी चिंचोली कोविड सेंटरमध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांपैकी मलठन : 04, खडकी : 09, रावणगाव : 01, वाटलुज : 02, आलेगाव : 01, कुरकुंभ : 03
स्वामी चिंचोली : 01
मदनवाडी (इंदापूर) : 02
बोरिबेल : 01
मळद : 01 अशी गाव निहाय आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये
18 पुरुष आणि 07 महिलांचा समावेश आहे.