Categories: Previos News

140 नंबरचा कॉल उचलू नका’ या मेसेजची सत्यता आली समोर, पोलीसही झाले होते या मेसेजचे शिकार, मात्र 140 नंबरची सत्यता बाहेर येताच अनेकजण संतापले



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

140 नंबरवरून आलेला कॉल उचलू नका’, असा मेसेज आला असेल तर घाबरू नका आणि तो मेसेज शेअर करत असाल तर अगोदर हे वाचा. 140 सुरुवात होणाऱ्या नंबरचा कॉल उचलू नका असा जो मेसेज फिरतोय तो व्हायरल व्हिडीओ मुंबई पोलिसांचा नसून व्हिडिओमध्ये जो पोलीस नागरिकांना सायबर गुन्हेगाराबाबत जनजागृती करीत आहे एका शोचे प्रोमोशन साठी होत असलेली जाहिरात असल्याचे समोर येत आहे. 140 या क्रमाकांवरुन सुरू होणारे कॉल घेऊ नका. तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते असे या व्हिडिओमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल सांगताना दिसत आहे. https://twitter.com/MahaCyber1/status/1281633818445635584?s=19

मात्र हा व्हिडिओ आणि त्याच सोबत व्हायरल झालेल्या मेसेजने राज्यात भीती निर्माण झाली आहे. राज्याच्या सायबर सेलने अखेर याची गंभीर दखल घेत तपास केल्यानंतर जे सत्य बाहेर आलं त्यामुळे अनेकजण चक्रावले आहेत. विशेष म्हणजे हा मेसेज अनेक पोलिसांनीही शेअर केल्याने नागरिकांमध्ये जास्तच गोंधळ निर्माण झाला होता. मात्र हा व्हिडिओ सोनी लाईव्ह या वाहिनेने आपल्या एका सिरीयलचे प्रमोशन करण्यासाठी तयार केल्याचे सायबर सेलने समोर आणले असून व्हायरल झालेला व्हिडिओ हा मुंबई पोलिसांचा नसून सोनी लाईव्ह वाहिनेने तयार केला आहे व तो त्यांच्या प्रमोशनसाठी तो व्हायरल करण्यात आला आहे. यात जो 140 नंबरच्या सिरियलचा उल्लेख करण्यात आला आहे ती 140 फोन नंबरची सिरीयल ही टेली मार्केटिंगची असल्याचेही सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल राज्याच्या सायबर सेल विभागाने घेत  https://twitter.com/MahaCyber1/status/1281621454249840640?s=19

सोनी चॅनेलला हा व्हिडिओ त्वरित बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.

Maha Cyber Cell twit

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago