Categories: Previos News

रेल्वे अंगावरून गेल्याने रुळावर झोपलेले 14 मजूर जागीच ठार, औरंगाबादजवळील भीषण घटना

: सहकारनामा ऑनलाईन

औरंगाबाद जवळ असणाऱ्या बदनापूर कर्माड दरम्यान मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. आपल्या गावाकडे पायी निघालेल्या मजुरांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने यामध्ये 14 मजूर ठार झाले आहेत तर अन्य जखमी झाले आहेत. झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व मजूर जालना येथील एका स्टील कंपनीत काम करत असल्याचे समोर येत असून ते सर्व मजूर औरंगाबादहून गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी पायी जात होते. रात्री ते सर्वजण रुळावर झोपले होते. झोपेतच त्यांच्या अंगावरून मालगाडी गेल्याने ही भीषण घटना घडली आहे. परप्रांतीयांना आपल्या गावी जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपणही एखाद्या गाडीने गावी जाण्यास मिळेल असे वाटल्याने हे मजूर जालन्याच्या एका स्टील कंपनीतून रातोरात औरंगाबादकडे पायी निघाले होते अशी माहिती मिळत आहे. दरम्यान बदनापूर ते करमाडच्या सटाणा या गावाजवळ रात्र झाली म्हणून ते बिस्तारा टाकून झोपी गेले. आणि आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जालन्याकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या मालगाडीचा त्यांना थांगपत्ता लागला नाही त्यामुळे यातील १४ जण मालगाडीखाली येऊन जागीच ठार झाले. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago