दौंड’मधून 14 गुंड तडीपार, दौंड पोलिसांची धडक कारवाई



दौंड: सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी) 

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दौंड पोलिसांनी धडक कारवाई करीत १४ गुंडांना तडीपार केले असल्याची  माहिती दौंडचे पो. नि. सुनील महाडिक यांनी दिली.

दौंड पोलीस ठाणे हद्दीतून मागील वर्षात जवळपास ४० गुंडांना तडीपार करण्यात आलेले आहे त्याच अनुषंगाने सन २०२० मध्ये सुद्धा दौंड पोलिसांनी पुणे जि. ग्रामीणचे पोलिस अधीक्षक यांच्याकडे तडीपारी चे प्रस्ताव पाठविले होते, त्यानुसार दोन पेक्षा जास्त मारामारीचे गुन्हे ,जबरी चोरी,विनयभंग, दारूविक्री यासारखे गुन्हे दाखल असणाऱ्या १४ गुंडांना पोलीस अधीक्षक यांनी तडीपार करण्याचे आदेश दिलेले आहेत.

सदर गुन्हेगार पुन्हा विनापरवाना दौंड मध्ये दिसून आल्यास त्याच्यावर गुन्हा  दाखल करण्यात येणार असून या गुंडांवर झोपडपट्टी दादा कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात पाठविण्यात येणार असल्याचे दौंड पो. स्टेशन चे पो.नि. सुनील महाडिक यांनी सांगितले आहे.

दीपक विधाते, पंकज निमजे, जॉय नवगिरे, शाहिद शेख,राहुल कम्प्लिकर, अजय चनूर, लिंगाप्पा चूनूर, सोनू शेटे, मनोज नरळे, सुरज हो समाने, सागर कांबळे, लखन  सरवय्या, सागर अल्लाट, सुशांत कांबळे, विशाल काटकर अशी तडीपार केलेल्या गुंडांची नावे आहेत. सदरची कारवाई पो. नि. सुनील महाडिक,सहाय्यक पो. नि. ऋषिकेश अधिकारी, सहा. पो.फौजदार भाकरे,पो.ना. सचिन बोराडे,पो. हवा. शिंगाडे,आसिफ शेख, पांडुरंग थोरात, हिरवे, पो. शि. वल्लेकर, गुंजाळ, वाघ, गाढवे, गवळी व अमोल देवकाते यांनी केली.