दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील यवत कोविड सेंटरमधून आलेल्या रिपोर्टनुसार 6 गावांतील तब्बल 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून एकूण 111 जणांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती.
यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यवत 7, भांडगाव 1, केडगाव 1, बोरीपार्धी 2, खुटबाव 2, नानगाव 1 असे या 6 गावांतील 14 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोरोना बाधित रुग्णांमध्ये 3 वर्षाच्या बालकासह 95 वर्षांच्या वृद्धांचा समावेश असून यामध्ये 8 पुरुष आणि 6 महिलांचा समावेश आहे अशी माहिती डॉ.इरवाडकर यांकडून मिळाली.