दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहर व परिसरात आज 14 जणांना नव्याने संसर्गाची बाधा झाली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बाधित रुग्णांमध्ये एका दोन वर्षाच्या बाळाचा समावेश आहे. शहरातील बाधित रुग्णांची संख्या रोजच वाढत असल्याने कोविड सेंटर मधील बेड फुल झालेले आहेत, त्यामुळे दौंड करांनी आता खूपच काळजीने वागणे गरजेचे झाले आहे.
दि.23 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 70 संशयितांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली, त्यापैकी तब्बल 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अवघ्या दोन वर्षाच्या बाळा सह 42 वर्ष वयोगटातील 8 महिला व 6 पुरुष रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. शहरातील 7, गोपाळवाडी 4, ग्रामीण भाग 2 तसेच रा रा पो दलातील एका जवानाला संसर्ग झाली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.
कोरोना योद्ध्यांना घ्यावे लागत आहेत घरीच उपचार..
दौंडकर कोरोना बाधित रुग्णांची सेवा करताना येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉ अजीम शेख व डॉ. तबस्सुम शेख या कोविड योध्या नाच संसर्गाची बाधा झाली आहे, उपजिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा ह्या बाधित रुग्ण व कोरोना संशयित रुग्णांनी व्यापले असल्या कारणाने नाईलाजास्तव आम्हाला आमच्या कोविड योद्ध्यांना त्यांच्या घरीच उपचार द्यावे लागत आहेत अशी खंत डॉ डांगे यांनी व्यक्त केली आहे.