केरळ :
दुबई ते कोझिकोड असा प्रवास करणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला केरळ येथील करिपूर विमानतळावर उतरताना अपघात होऊन यामध्ये सुमारे 14 जणांचा मृत्यू झाला असून 123 जण जखमी झाले आहेत. यातील 15 जण गंभीर असल्याचेही सांगण्यात येत असून या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केले आहे.
केरळच्या विमानतळावर एअर इंडियाचे हे विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून ते विमान घसरले आणि त्याचा अपघात होऊन दोन तुकडे झाले अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या विमान अपघातामध्ये दोन वैमानिकांचाही मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे. यातील एक वैमानिक हा महाराष्ट्राचा असल्याची माहिती समोर आली आहे.
एअर इंडियाच्या या विमानामध्ये 6 क्रू मेम्बर, 2 पायलट आणि 191 प्रवासी होते.
ही भीषण अपघाताची घटना रात्री 7:45 वाजता करिपूर विमानतळावर विमान लँड करत असताना घडली.