दौंड : सहकारनामा
दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालया मध्ये आज दिनांक 25/2/21 रोजी एकूण 96 लोकांची कोविड अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे.
त्याचा अहवाल आला असून या टेस्टमध्ये 14 जण पॉझिटिव्ह आले असून 82 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाबतची विस्तृत माहिती दौंड उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दौंड शहरामध्ये 6 तर दौंड शहर परिसरात असणाऱ्या ग्रामिण भागामध्ये 8 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 9 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली आहे.