दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
आज शहरात नव्याने दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. सध्या शहरातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याची संख्या अत्यंत कमी झालेली दिसून येत आहे. उपजिल्हा रुग्णालयाने दि.१२ रोजी शहरातील 149 संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते, त्यांचा अहवाल आज रोजी प्राप्त झाला. अहवालानुसार 149 संशयितां पैकी फक्त दोन जणांचा अहवाल पॉझिटिव आला आहे तर तब्बल 134 जणांना कोरोनाने दिलासा दिला आहे. 15 जणांचा अहवाल प्रलंबित असून एक पुरुष व एक महिला पॉझिटिव्ह आढळून आली आहे. राज्य राखीव पोलीस दल व कस्तान चाळ परिसरातील रुग्णाचा यामध्ये समावेश आहे अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. शहरातून कोरोना आऊट होण्याच्या मार्गावर आहे मात्र शहरात कोरोना डोकं पुन्हा वर काढणार नाही यासाठी दौंड करांनी अधिकची काळजी घेणे आवश्यक आहे.