Categories: Previos News

दौंड’मध्ये एकाच कुटुंबातील 13’ जणांना कोरोनाची बाधा



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाने आपले जाळे पसरवायला सुरुवात केली असून आता त्याने आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवल्याचे पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यातील महत्वाचा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या दौंड तालुक्यामध्येही कोरोनाने आपले जाळे वाढवायला सुरुवात केली आहे. दौंड शहरामध्येच एकाच कुटुंबातील तब्बल 13 जणांना कोरोनाची बाधा झाली असून यामध्ये पाच लहान आणि एका वयस्क  महिलेचा समावेश आहे.

अगोदर या कुटुंबातील 7 जण कोरोना बाधित झाले होते नंतर आता पुन्हा त्यामध्ये 6 ने वाढ होऊन कुटुंबातील एकूण कोरोना बाधितांची संख्या तेरा झाली आहे.

कोरोना बाधित झालेले कुटुंब हे दौंड शहरात दूध विक्री करणाऱ्या इसमाचे असून अगोदर या कुटुंबातील एका वयस्क व्यक्तीस चार दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या 6 नातेवाईकांना बाधा झाली.

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील अन्य लोकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल आज शनिवार दि 13 जून रोजी आला आहे. या अहवालामध्ये सहा जणांना बाधा झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्या कुटुंबातील एकूण बधितांची संख्या ही 13 झाली आहे. त्यामुळे सध्या नुसत्या दौंड शहरातील कोरोना इफेक्ट झालेल्यांची संख्या 25 असून त्यामध्ये SRPF 8 जवान आणि 17 इतर स्थानिक रहिवास्यांचा समावेश आहे.

Sahkarnama

Recent Posts

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

16 तास ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

2 दिवस ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

4 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

4 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

4 दिवस ago