दौंड : सहकारनामा
दौंड ग्रामिण पाठोपाठ दौंड शहरातही कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला आहे.
आज एकाच दिवसात दौंड शहरात 13 जणांना कोरोनाची लागण झाली असून दौंड तालुक्यात शहर आणि ग्रामिण असे एका दिवसात 27 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
दौंड शहरामध्ये आज 77 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट (कोरोना टेस्ट) करण्यात आली. त्यामध्ये 13 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
दौंड तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढू लागले असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणांकडून करण्यात येत आहे, मात्र नागरिक याकडे गंभीरपणे पाहत नसल्याने रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे.
नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, हस्तांदोलन टाळणे, हात साबणाने स्वच्छ धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे आणि गर्दीची ठिकाणे, गर्दी टाळणे आता गरजेचे बनले आहे.