Categories: Previos News

तेहरान’च्या मेडिकल सेंटर मध्ये जोरदार स्फोट, 13 जण ठार



वृत्तसंस्था : सहकारनामा ऑनलाईन

इराणची राजधानी असलेल्या तेहरानमध्ये असलेल्या वैद्यकीय क्लिनिकमध्ये झालेल्या जोरदार स्फोटात तब्बल 13 जण ठार झाल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

याबाबतची माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली असून द टाइम्स ऑफ इसराईलनेही याबाबत संपूर्ण वृत्त प्रसिद्ध केले आहे. आलेल्या वृत्तानुसार हे स्फोट तेहरान मध्ये असलेल्या सीना अथर मेडिकल सेंटर मधील ऑक्सिजन टाक्यांमुळे झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून   आतमध्ये अडकलेल्या लोकांना वाचविण्याचा अग्निशमन दलाचा प्रयत्न सुरू होते. तेहरानच्या स्थानिक वेळेनुसा रात्री 9: 30 वाजता हे स्फोट झाले असल्याची पुष्टी करण्यात येत असून भारतीय वेळेनुसार साधारण रात्री 12:45 ला स्फोट झाले आहेत. या वैद्यकीय क्लिनिकमध्ये झालेल्या स्फोटामुळे इराणची राजधानी धमाक्यांनी हादरली असून इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने त्यांच्या वेळेनुसार  मंगळवारी रात्री उत्तर तेहरानमधील वैद्यकीय क्लिनिकमध्ये मोठे स्फोट झाल्याचे सांगितले असून  या नंतर सीना अथर मेडिकल सेंटर येथे आग लागल्याची घटना घडली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ही विझविण्यासाठी मोठी झुंज दिल्याचे सांगितले.

Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago