दौंड शहरासह परिसरात 13 जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड शहर आणि तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले असताना दौंड शहर आणि परिसरातून थोडी दिलासादायक बातमी येत आहे. एकूण 190 पैकी 13 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून सरासरी पॉझिटिव्ह येणाऱ्यांची टक्केवारी 6.8% आली असल्याने दौंडकरांच्या चिंता थोड्या कमी झाल्या आहेत. 

दिनांक 4/9/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 190 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यांचे अहवाल अर्ध्या तासात प्राप्त झाले आहेत. 190 पैकी एकूण 13 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 177 व्यक्ती चे अहवाल आले आहेत अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह अलेल्यांमध्ये मध्ये 2 महिला आणि 11 पुरुषांचा समावेश असून यामध्ये गिरीम, बोरावकेनगर, देवकिनगर, कुरकुंभ असे दौंड शहर 7 तर ग्रामीण भागामध्ये 6 जण असे 13 जण आढळून आले आहेत. या सर्वांचे वयोगट हे 26 ते  61 वर्ष असे आहे.