दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालायमध्ये या वर्षीही 12 वी मध्ये मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा 12 वीचा निकाल आज गुरुवार दि.16 रोजी ऑनलाइन स्वरूपात जाहीर झाला. यामध्ये जवाहरलाल उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत 122 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी 121 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेचा 99.18% आणि वाणिज्य शाखेचा निकाल 98.46% टक्के निकाल लागला असून कला शाखेचा निकाल 65.04 टक्के एवढा निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु.नेहा जालिंदर कांबळे हिचा आला असून तीला 93.23% गुण मिळाले आहेत.
प्रथम आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पुढील प्रमाणे
विज्ञान शाखा :
कु.कांबळे नेहा जालिंदर – 93.23%
कु. गिरमे ऋतुजा मधुकर – 86.62
कु.शेळके श्वेता रामचंद्र – 85.69%
अलभर हर्षद देवराम – 83.23%
गदादे ओंकार अशोक – 82.46% गुण
वाणिज्य शाखा :
कु.रोडे तृप्ती हनुमंत – 85.23%
कु. दरेकर आरती भाऊसाहेब – 79.38%
कु.भोसले प्रतिभा सुरेश – 79.23%
क.शिकिलकर सामिया साजीद – 78.30%
राजपुरे ज्ञानेश्वर नारायण – 76.30%
कला शाखा :
पावसे आरती राजू – 80.07%
घुमरे गणेश सखाराम – 78.15%
कु. सलगर प्रियांका देविदास – 76.30%
कु. देवकाते रूपाली राजाराम – 67.53%
सोडनवर कृष्णा भाऊ – 66.92%
या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकवर्ग आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.