दौंड : केडगाव-चौफुला रोडवर दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावले, 32 हजार 800 रुपयांचा ऐवज लंपास

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव-चौफुला रोडवर बोरीपार्धी गावाच्या हद्दीमध्ये एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसका मारून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी प्रिया गिरीश पालकर (वय 29, व्यवसाय टेक्निशियन, सध्या रा.मयुरेश्वर हॉस्पिटल बोरीपार्धी, ता.दौंड) यांच्या फिर्यादीवरून दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि.11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी प्रिया पालकर व त्यांच्या मैत्रीणी या केडगाव स्टेशन बाजूने मयुरेश्वर हॉस्पिटलकडे पायी चालत येत असताना पाठीमागून अचानकपणे
एक स्पोर्ट मोटर सायकल बाईक वरून दोन इसम आले व मोटर सायकलवर पाठीमागील बाजुस बसलेल्या इसमाने फिर्यादीच्या गळयातील एक तोळा वजन असलेले 32 हजार 800 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसका मारून चोरी करून मोटरसायकलवर भरधाव वेगात निघुन गेले.
यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गंपले हे करीत आहेत.