पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांची फसवणूक करणाऱ्यास अटक – स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

पुणे ग्रामिण :आपण पोलीस आहोत अशी बतावणी करून वृद्ध नागरिकांना फसविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना फसवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यास आळा घालण्यासाठी सदर गुन्हा करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्याच्या सूचना पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.

सदर गुन्ह्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक खेड-जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना
पोलीस कॉन्स्टेबल अक्षय नवले यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खबर मिळाली की सदर गुन्ह्यांमध्ये वापरलेली मोटरसायकल ही लोणी काळभोर येथे राहणारा अलीरजा उर्फ अवनू इराणी हा वापरत असून त्याच्यावर यापूर्वी देखील मालमत्तेचे गुन्हे दाखल आहेत. तसेच तो आज शिरोली गावच्या हद्दीत शिरोली फाटा याठिकाणी येणार असल्याचे खात्रीशीर माहिती मिळाली. या बातमीच्या आधारे वरील पथकाने सापळा रचून एका संशयित इसमाला ताब्यात घेतले. आणि त्यास त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अलीरजा उर्फ अवनु हुसेन इराणी (वय २२
वर्षे, रा.पठारे वस्ती लोणी काळभोर, जि.पुणे) असे सांगितले.

त्याच्याकडे सदर जर गुन्ह्याची अधिक
चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा हा तो आणि त्याचा एक साथीदार असा दोघांनी मिळून केल्याची कबुली दिली. पोलीस पथकाने त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, मोबाइल
तसेच एक सोन्याची अंगठी असा एकूण १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरची कार्यवाही ही पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि नेताजी गंधारे, पोसई शिवाजी ननावरे, पो.हवा दिपक साबळे, पो.हवा विक्रम तापकीर, पो. हवा हेमंत विरोळे, पो.ना संदीप वारे, पो.शि.अक्षय नवले, पो.शि धीरज जाधव, पो.शि.निलेश सुपेकर, पो.शि.प्रसन्न घाडगे, सफो राजापूरे यांनी केली आहे.