Categories: Previos News

बापरे… पुणे जिल्ह्याच्या ‛या’ एकाच कंपनीत 120 कामगारांना ‛कोरोना’



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

चिनवरून प्रवास करून पुणे जिल्ह्यात आलेल्या कोरोना व्हायरसने आता पुणे जिल्ह्यातही चांगलेच थैमान घातले आहे. हा कोरोना व्हायरस पुणे जिल्ह्यामध्ये आपला इतका जम बसवेल असे कुणालाही वाटत नव्हते मात्र त्याचा वाढत असलेला वेग पाहता याला रोखावे कसे हाच मोठा प्रश्न सध्या सर्वांसमोर उभा आहे.

विविध उपाय करूनही कोरोना आता थेट कंपन्यांना लक्ष करू लागला आहे. आज चाकण येथील MIDC मध्ये असणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीत काम करणाऱ्या तब्बल 120  कामगारांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने MIDC परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. 

हा भयानक प्रकार समोर आल्यानंतर तातडीने हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रशाकीय यंत्रणा कामाला लागली असून आज गट विकास आधिकारी अजय जोशी आणि तालुका आरोग्य आधिकारी बळीराम गाढवे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

चाकणच्या या प्रसिद्ध कंपनीत इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित  कामगार सापडल्याने या कामगारांच्या संपर्कात आलेले येथील अनेक कामगार चिंतेत वावरताना दिसत आहेत.

कोरोना बाधित कामगार हे खेड तालुका आणि पिंपरी चिंचवड परिसरातील असल्याची माहितीही समोर येत आहे.

Sahkarnama

Recent Posts

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

पिडीसीसी बँकेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न : मा.अध्यक्ष रमेश थोरात

11 तास ago

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

दौंडमध्ये तुतारीनं रणशिंग फुकलं.. प्रचार दौऱ्यांना सुरुवात

12 तास ago

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

आरारा.. खतरनाक, ज्याला समजलं जात होतं विद्वान | तेच निघू लागलं बालिश

13 तास ago

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

दौंड तालुक्यात सुरक्षा रक्षकाचा हवेत गोळीबार | ‘या’ दोन गावांतील एटीएम फोडण्याचा प्रयत्न

21 तास ago

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ कार्य, संस्कारांची दिली पावती

तिकीट द्या म्हणून ज्यांची केली जातेय विनवनी, त्यांनी भरसभेत ‘कुलांच्या’ संस्कारांची दिली पावती

2 दिवस ago

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

3 दिवस ago