Categories: Previos News

केडगावमध्ये 12’वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील केडगाव येथे 12वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही विद्यार्थिनी केडगाव स्टेशनमध्ये   असलेल्या विष्णुप्रिया सोसायटीत आई, वडीलांसह  राहत होती. ऋतुजा पवार असे या मुलीचे नाव असून ती मिशन स्कुलमध्ये शिकत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापरे यांनी सांगितले. दि.१८ एप्रिल रोजी रात्री ऋतुजा आणि तिचे आई, वडील जेवण करून झोपी गेले. पहाटे उठल्यानंतर तिच्या आई, वडिलांना ऋतुजाने तिच्या बेडरूममध्ये स्वतःच्या ओढणीने स्लॅबच्या हुकला  बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी त्यांनी शेजाऱ्यांना आणि पोलिसांना याबाबतची माहिती दिली. ऋतुजाने नेमक्या कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजले नसून त्याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago