दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
कोरोनाचा राक्षस दौंड तालुक्यामध्ये ठाण मांडून बसला आहे. काही केल्या तो लवकर जाण्याचे नाव घेईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
आज दिनांक 8/9/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 115 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली त्यांचे अहवाल हे अवघ्या अर्ध्या तासात प्राप्त झाले असून या पैकी एकूण 12 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 10 3 व्यक्तीचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 7 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये दौंड शहर 8 आणि दौंड
ग्रामीण 4 अशी आकडेवारी असून कोरोना बाधित रुग्णांचे वयोगट हे 9 वर्षे ते 82 वर्ष इतके आहे.