|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी तसेच नागरी सुविधा व जनसुविधा अंतर्गत लहान व मोठ्या ग्रामपंचायतच्या सुविधांसाठी सुमारे १२ कोटी २० लक्ष रुपये निधी जिल्हा नियोजन समिती कडून मिळाल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली.
दौंड तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी अंतर्गत रस्ते गटारलाईन, ग्रामपंचायत कार्यालय यासाठी निधी मिळणेबाबत ग्रामस्थ व कार्यकर्त्यांनी मागणी केली होती त्यानुसार आमदार राहुल कुल यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा करून हा निधी मिळविला आहे. यापुढील काळात देखील तालुक्यातील सर्व गावांना निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार राहुल कुल यांनी यावेळी सांगितले आहे. दौंड तालुक्यासाठी प्राप्त झालेला निधीची माहिती पुढील प्रमाणे
इतर जिल्हा मार्ग – अंतर्गत एकूण प्राप्त निधी – ३ कोटी रुपये
दौंड गोपाळवाडी MIDC रस्ता (इजिमा १६३) – १ कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग ९ ते लोणारवाडी काळेवाडी चौक रस्ता (इजिमा १७५) – १ कोटी रुपये, राष्ट्रीय महामार्ग ९ पांढरेवाडी ते बारामती पाटस रस्ता (इजिमा १७१) – ५० लक्ष रुपये, बेटवाडी ते नवीन गार रस्ता (इजिमा १६६) – ५० लक्ष रुपये
ग्रामीण मार्ग – अंतर्गत एकूण प्राप्त निधी – ३ कोटी रुपये
पडवी माळवाडी रस्ता रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग २४१) – ५० लक्ष रुपये, गाडीमोडी ते शेलारवाडी रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग ४४)– ३० लक्ष रुपये, ग्रामीण मार्ग ५१ ते भरतगाव रस्ताकरणे – ३० लक्ष रुपये, खोर येथील गायकवाड वस्ती लवांडे वस्ती फरतरेवस्ती रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग १६४)– २० लक्ष रुपये, खोर येथील हरीबाचीवाडी रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग १०४) – २० लक्ष रुपये, केडगाव ते हंडाळवाडी रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग २१)– ३० लक्ष रुपये, राहू ते माधवननगर रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग ७२) – ४० लक्ष रुपये, राहू, सहकारनगर ते पाटलाचा मळा (रानमळा) रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग ६४/२७८)– ३० लक्ष रुपये, वरवंड माळवाडी रोड ते फरगडेवस्ती रस्ता करणे, (ग्रामीण मार्ग २७३) – २० लक्ष रुपये
*नागरी सुविधा अंतर्गत रस्ते करणेसाठी प्राप्त निधी – ३ कोटी २० लक्ष रुपये*
कासुर्डी – २५ लक्ष, कुरकुंभ – २५ लक्ष, केडगाव – २५ लक्ष, खडकी – २५ लक्ष, पाटस – २५ लक्ष, पिंपळगाव – २५ लक्ष, बोरीपार्धी – २५ लक्ष, यवत – २५ लक्ष राजेगाव – २५ लक्ष, राहु – ३० लक्ष, लिंगाळी – २५ लक्ष, वरवंड – २५ लक्ष, खडकी येथे ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम – १५ लक्ष
जनसुविधा अंतर्गत रस्ते करणेसाठी प्राप्त करणे – ३ कोटी रुपये
आलेगाव – २० लक्ष, एकेरीवाडी – १० लक्ष, कडेठाण – १० लक्ष, कुसेगाव – १५ लक्ष, खानोटा – १० लक्ष, खोर – १० लक्ष, डाळींब १० लक्ष, दापोडी – १० लक्ष, देऊळगाव राजे – २० लक्ष, नाथाचीवाडी -२० लक्ष, पिलाणवाडी – १० लक्ष, बोरीबेल – २० लक्ष, मलठण – २० लक्ष, मळद – १० लक्ष, रावणगाव – २० लक्ष, वाखारी – १० लक्ष, वाटलुज – १० लक्ष, वासुंदे – १०, सहजपूर – १० लक्ष, स्वामी चिंचोली – २० लक्ष, हिंगणीबेर्डी – १० लक्ष उंडवडी ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम – १५ लक्ष, अशा प्रकारे इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग दुरुस्तीसाठी तसेच नागरी सुविधा व जनसुविधा साठी सुमारे १२ कोटी २० लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे.