दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तरकाझी)
शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होऊन परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे वाटत असतानाच आज शहर व परिसरात पुन्हा 12 जणांना नव्याने कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दौंड करांनी अजूनही सतर्क राहणे गरजेचे आहे.
दि.5 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 73 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली, त्यापैकी 12 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.10 ते 52 वर्ष वयोगटातील 3 महिला व 9 पुरुष रुग्णांना संसर्गाची लागण झाली आहे.
रा.रा. पो. दल 3, नवगिरे वस्ती 3, रिलायन्स पेट्रोल पंप परिसर 2, विठ्ठल मंदिर( सुतार नेट)1, ग्रामीण 3 या परिसरातील रुग्णांचा बाधित रुग्णां मध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.