दौंड शहरामध्ये कोरोना नियंत्रणात! 118 पैकी फक्त 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

शहर व  परिसरातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे संकेत मिळत आहेत त्यामुळे येथील प्रशासन समाधान व्यक्त करीत आहे. 

दि. 7 रोजी येथील प्रशासनाच्या वतीने शहर व  परिसरातील 118 संशयितांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी  फक्त 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून तब्बल 113 जणांना दिलासा मिळाला आहे.

29 ते 49 वर्ष वयोगटातील 1 महिला व 4 पुरुष रुग्णांना नव्याने संसर्गाची  लागण झाली आहे. शहर 2,SRP 2,ग्रामीण 1 या  परिसरातील रुग्णांचा बाधित रुग्णांमध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.