Categories: क्राईम

कुरकुंभ एमआयडीसी मधील 1100 कोटींचे ड्रग्स ‘येथे’ तयार झाले, दौंड चे आंतरराष्ट्रीय ड्रग्स विक्री कनेक्शन ‘असे’ जगासमोर आले..

अब्बास शेख

दौंड : दौंड तालुक्याच्या कुरकुंभ  एमआयडीसी मध्ये पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत 1100 कोटींपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून त्यांनी केलेल्या या कारवाईत 550 किलो पेक्षा जास्त एमडी मेफेड्रॉन नामक ड्रग्स मिळून आले आहे. या संपूर्ण घटनेमुळे तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली असून दौंड तालुक्याचे ड्रग्स विक्रीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन आता समोर आले आहे.

पुणे पोलिसांनी कारवाई करत पुण्यात जे एम डी ड्रग्स पकडले होते ते मुंबईला पाठवण्यात येणार होते. मुंबईतील पॉल आणि ब्राऊन या ड्रग्स पेडलरकडे या ड्रग्सची विक्री होणार होती मात्र दोन दिवसांपूर्वी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आणि या सर्व प्रकरणाचा भांडाफोड झाला. पुणे पोलिसांनी आरोपी वैभव माने, अजय कारोसिया, हैदर शेख या तीन आरोपींना पकडले होते. यातील माने आणि हैदर यांच्याविरोधात अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.

हे सर्व रॅकेट उघड होत असताना एमडी ड्रग्सचे कनेक्शन दौंडच्या कुरकुंभ एमआयडीत आढळले. त्यामुळे पुणे शहर पोलिसांच्या दहा गाड्यांच्या ताफ्याने थेट कुरकुंभ एमआयडीसी मध्ये छापा टाकला या एमआयडीसीतील अर्थकेम लॅबोरेटरी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात मेफेड्रींन (एमडी) ड्रग सापडले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. ड्रग्स रॅकेट संबंधी सोमवारी पुण्यात पकडला गेलेला साठा हा कुरकुंभ येथील कंपनीशी निगडीत असल्याचे बोलले जात आहे. कुरकुंभ एमआयडीसी केमिकल झोन असून यापूर्वी देखील अनेकवेळा अशा धाडी टाकण्यात आल्या असून या कंपनीत आणखी किती ड्रग साठा आहे याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. 

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

14 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago