Categories: Previos News

म्युकर मायकोसीस आजाराच्या पार्श्वभूमीवर दौंडमध्ये 110 रुग्णांची शिबिरामध्ये तपासणी



|सहकारनामा|

दौंड : (अख्तर काझी) कोरोनाने सर्वत्र कहर केला असताना आता म्युकर मायकोसीस या अत्यंत भयावह आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोना पाठोपाठ या आजाराचा ही सर्वत्र प्रादुर्भाव होत आहे. या  पार्श्वभूमीवर नगरसेविका हेमलता परदेशी व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण परदेशी यांच्या पुढाकाराने, स्वराज्य नागरी पतसंस्थेच्या वतीने  स्वर्गीय अजय गौड यांच्या स्मरणार्थ दौंड मध्ये  मोफत डोळे व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

शिबिरामध्ये नेत्रतज्ञ डॉ.प्रेम कुमार भट्टड व दंत चिकित्सक डॉ. दीपक जाधव यांनी 110 रुग्णांची तपासणी केली, यापैकी कोणासही म्युकर मायकोसीस आजाराची  लागण  झाली नसल्याचे  निष्पन्न  झाले. कोरोना  मुक्त  होऊन  20  दिवस  पूर्ण  झालेले रुग्ण  व  ज्यांना  मधुमेह  तसेच  रक्तदाबाचा  आजार  आहे  अशा  रुग्णांचा  यामध्ये  समावेश  होता.हा सध्याचा घातक आजार आहे, या आजाराची बरीच लक्षणे ही डोळे आणि दातां मार्फतच दिसत आहेत, लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना वेळीच योग्य उपचार मिळावे या  उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले असे  प्रवीण  परदेशी  यांनी यावेळी सांगितले. 

शिबिरास दिनेश फराटे, समीर राजोपाध्ये, श्याम सुंदर सोनोने, वैजनाथ जाधव, अनिकेत वैद्य, निखिल शिंदे, पंकज उंडे, मुकेश ठकवानी, विशेष परमार, दादा काळे ,सरिता गौड, श्रिया परदेशी,आनंद गटणे आदींचे सहकार्य लाभले.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago