देऊळगाव राजे येथे रॅपिड अँटीजेन टेस्ट कॅम्प संपन्न, 110 पैकी इतके जण निघाले पॉझिटिव्ह



| सहकारनामा |

दौंड (देउळगाव राजे) : प्रशांत वाबळे 

 देउळगाव राजे ता.दौंड येथे शुक्रवार दि.३० रोजी मा. जी. प.सदस्य वीरधवल जगदाळे आणि देउळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्र  यांच्या सहकार्यातून ग्रामपंचायत कार्यालय येथे अँटीजजेन टेस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या वेळी संशयित रुग्ण, सर्व किराणा, भाजीपाला दुकानदार व अगोदर पॉझिटिव्ह  आलेल्या रुग्णांचे नातेवाईक यांची प्राधान्याने टेस्ट करून घेण्यात आली.

 या कॅम्पमध्ये ११० जनांचे सॅम्पल घेण्यात आले होते. यात ३५ पॉजिटिव व ७५ जन निगेटिव आले असल्याची माहिती देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सांगळे यांनी दिली. यातील जवळपास २५ पॉजिटिव पेशंट देउळगाव राजे येथील असून उर्वरीत देउळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावातील आहेत.

सर्व पॉजिटिव पेशंट लिंगाळी येथील कोविड सेंटरला पाठवन्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. हा कँम्प यशस्वी करण्यासाठी सरपंच स्वाती गिरमकर, अमित गिरमकर, मदन खेडकर, दादा गिरमकर, अप्पासाहेब खेडकर, महादेव औताडे यांनी विशेष प्रयत्न केले.