दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
कोरोना दौंड शहराचा पिच्छा सोडायला तयार नाही अशी परिस्थिती सध्या झाली आहे. रोज शहरातील विविध भागात बाधित रुग्ण आढळून येत आहेत, त्यामुळे नागरिकांनी आतातरी जागे व्हावे अशी म्हणण्याची वेळ येथील प्रशासनावर आली आहे.
दि.16 रोजी उपजिल्हा रुग्णालयाने शहर व परिसरातील 91 संशयितांची रॅपिड अँटिजेंन तपासणी केली असता त्यापैकी 18 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर 73 जणांना दिलासाही मिळाला आहे.
4 वर्षाच्या बाळासह 65 वर्ष वयोगटा पर्यंतच्या 7 महिला व 11 पुरुष रुग्णांना संसर्ग झाला असून शहरातील 11, गोपाळवाडी 4 तसेच ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली.